जळगाव मिरर | ९ जानेवारी २०२४
राज्यात शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी राजकीय भूकंप झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. त्यानंतर आता एक चर्चा सुरु झाली आहे की अजित पवार गटात घालमेल आहे. काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार कुंपणावर आहेत असा एक उल्लेख केला होता. आज शरद पवार यांना या विषयी प्रश्न विचारला असता त्यांनी यावर आपलं म्हणणं मांडलं आहे.
अजित पवार गटात घालमेल सुरु आहेत काही आमदार परत आले तर तुम्ही त्यांना घेणार का? असा प्रश्न विचारला असता, शरद पवार म्हणाले, “अजित पवार गटात घालमेल सुरु असेल की मला माहीत नाही. पण आता त्यांच्यासंबंधीची आमची भूमिका स्पष्ट आहे. ज्यांनी हा निर्णय घेतल्या त्यांच्याविषयी आमच्या पक्षात फेरविचार होणार नाही. सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेणारे नेते आणि त्यांच्यासह गेलेल्या सगळ्यांना पक्षाचे दरवाजे बंदच असतील” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. आमची ही भूमिका स्वच्छ आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.