जळगाव मिरर / २२ फेब्रुवारी २०२३ ।
राज्यभर अगदी मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी झाली जळगाव जिल्ह्यात हि मोठ्या शिवभक्तांच्या जल्लोषात भव्य दिव्य मिरवणूक शहरातून निघाल्याने शहराला भगवे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील हेमंत फाउंडेशनतर्फे शिव जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराजांना पुष्पहार अर्पण करीत ‘जय भवानी जय शिवाजी’, च्या घोषणा देत शिवजयंतीत कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शहरातील भास्कर मार्केट परिसरात दोन दिवस आधी भगव्या पताका झेंडे लावून परिसराला भगवेमय करण्यात आले होते. यावेळी फाउंडेशनतर्फे संपूर्ण परिसरात साफसफाई करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष हेमंत भंगाळे, सचिव हेमराज वराडे, उपाध्यक्ष वसंत कोलते, दिलीप साळुंखे ,राहुल सूर्यवंशी, राहुल पाटील, नैतिक भंगाळे, आनंद पाटील, किशोर साळुंखे, नाना मोरे, गोलू कोळी, दिनेश चौधरी, ओम साळुंखे, मनोज कोळी, अतुल साळुंखे ,कैलास गवळी ,राजु चौधरी ,प्रवीण पाटील ,आनंद न्हावी ,राहुल चौधरी ,मयूर पाटील आदीची उपस्थिती होती. यावेळी राहुल सूर्यवंशी यांनी शिव जयंतीची महत्व पटवून दिले.