जळगाव मिरर | ६ ऑगस्ट २०२५
यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे अंगणात गुरांचे शेण पडल्याच्या कारणावरून पिता-पुत्रांना ८ जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली. यात एकाच्या डोक्यात चाकूने वार करून जखमी केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, डांभुर्णी येथील पंडित नगरमध्ये अंगणात गुरांचे शेण पडल्याच्या कारणावरून वाद झाला. याच वादातून बाळू अशोक धनगर (वय ४०) व त्यांचे वडील अशोक रामचंद्र धनगर या पिता-पुत्रांना संतोष पुंडलिक कोळी, उमाकांत पुंडलिक कोळी, रोहित उमाकांत कोळी, पवन उमाकांत कोळी, अरुणा संतोष कोळी, मनीषा उमाकांत कोळी, तेजस संतोष कोळी व अविनाश डिगंबर कोळी या ८ जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तर अशोक धनगर यांच्या डोक्यावर पवन कोळी याने चाकूने वार करून जखमी केली.
याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बाळू धनगर यांच्या फिर्यादीवरून या सर्व ८ जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.नि. रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनात हवालदार संदीप सूर्यवंशी, पोलीस नाईक किशोर परदेशी करत आहेत.
