जळगाव शहरात गेल्या काही दिवसा आधीच के.सी.पार्क परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी झाल्यानंतर हवेत गोळीबार केल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात सकाळी 11 वाजेच्या सुमारास एकाने गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकात मध्ये असलेल्या फातिमान नगरात काय जुन्या वादातून एका तरुणाने गोळीबार केल्याची घटना दिनांक १० ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली या गोळीबारच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतल्याचे समजते.
काय घडली घटना
शहरातील एमआयडीसी परिसरातील 20 सेक्टर मधील प्रभाग कंपनी समोर गुरुवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जुन्या वादातून सोपान याने गावठी कट्टा घेऊन आकाश तोवर यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीचा राग येऊन कमरेला लावलेला असलेला गावठी कट्टा काढून आकाशवर दोन वेळा हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कुणाला काही दुखापत झालेली नाही त्याच्या जवळील गावठी कट्टा आणि एक जिवंत काढतोस पोलिसांनी हस्तगत केले आहे. घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक संदीप गावित, एमआयडीसी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, सचिन पाटील, इमरान खान यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती शेवटचे वृत्त हाती आले. तेव्हा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.