जळगाव मिरर | ३० ऑक्टोबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून यंदाच्या निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडीसह अनेक पक्षांतील नेत्यांनी सहभाग घेवून आपले उमेदवार मैदानात उतरविले आहे. तर राज्यात अनेक नेत्यांनी अपक्ष उमेदवारी करून आपले नशीब आजमविण्यासाठी मैदानात उतरले आहे. यातील जळगाव शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी देखील दि.२९ रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी दि.२९ रोजी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी हजारो जनतेच्या साक्षीने यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. दुपारी ११ वाजता शहरातील नेहरू चौकातून रॅलीला सुरुवात झाली या रॅलीत हजारो कार्यकर्ते तसेच महिला व पुरुष सहभागी झाले होते. त्यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण जोर लावल्याचे चित्र यावेळी दिसूण आले आहे. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या रॅलीने जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले होते.
यावेळी डॉ. अश्विन सोनवणे यांनी मंगळवारी आपला अपक्ष नामनिर्देशन अर्ज दाखल केला. यावेळी डॉ. शांताराम सोनवणे, इंजि. राहुल सोनवणे, अॅड. अमित सोनवणे, सपना सोनवणे, किशोर बाविस्कर, आबा बाविस्कर, धीरज सोनवणे, मंगलाताई सोनवणे, विलास यशवंते, राहुल मिस्तरी, पंकज सपकाळे, जितेंद्र सपकाळे, संदिप कोळी, भगवान कोळी, आकाश पारधे, रवी पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
