जळगाव मिरर | ३० ऑक्टोबर २०२४
बनावट कागदपत्रांसह कारचा क्रमांक बदलावून जळगावातील व्यावसायीक पियुष कमलकिशोर मणियार (वय २६, रा. गणेशवाडी) यांची नाशिक येथील संदेश चंद्रकांत काजळे (रा. विजय नगर, सिडको नाशिक) यांनी पाच लाखात फसवणुक केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश वाडीमध्ये पियुष मणियार हा तरुण व्यावसायीक राहत असून जानेवारीमध्ये त्यांच्या ओळखीचे नाशिक येथील संदेश काजळे यांच्यासोबत बोलणे झाल. काळजे यांचा चारचाकी खरेदी विक्रीचा व्यावसाय असल्याने त्यांनी (एमएच ०९, एफबी ७७२७) क्रमांकाची कार विक्रीस असल्याचे सांगितले. त्यानुसार काजळे यांनी त्यांचा चालक पप्णू याच्या मार्फत ती कार शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप येथे पाठवली होती. ती कार पियुष मणियार यांना पसंत पडल्याने ते संदेश काजळे यांच्यासोबत व्यवहार केला. त्यानंतर मणियार हे त्याच कारने नाशिक येथे गेले, त्यांनी कारच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता, काजळे यांनी कागदपत्रांच्या छायांकित प्रति दाखवित मूळ कागदपत्रे मालकाकडे असल्याचे सांगितले.
कार नावावर करुन देण्याची जबाबदारी काजळे यांनी घेतल्यानंतर पियुष मणियार यांनी त्यांना पाच लाख रुपये देत उर्वरीत पैसे व्यवहार पुर्ण झाल्यानंतर दिल्याचे सांगितले. मणियार यांनी कार ताब्यात घेतल्यानंतर त्यांना कागदपत्रांची छायांकित प्रत देण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात मणियार यांनी संदेश काजळे यांच्या मोबाईलवर फोन केल्यानंतर तो फोन त्यांच्या पत्नीने उचलला. यावेळी त्यांनी संदेश काजळे यांचे पंधरा दिवसांपुर्वी मयत झाल्याचे त्यांनी कळविले होते.
खरेदी केलेली कार दि. २८ ऑक्टोंबर रोजी गोलाणी मार्केट परिसरात उभी असतांना, वाहतुक पोलिसांनी त्या कारचा फोटो काढून त्यावर दंड ठोठावला. संबंधित कार मालकाने पोलिसांकडे विचारणा केल्यानंतर तो क्रमांक सांगली येथील सुहास सोलुंके यांच्या वाहनाचा असल्याचे उघड झाल्यानंतर काजळे यांनी मूळ वाहनाचा नंबर आणि बनावट कागदपत्रे तयार करुन विक्री केल्याचे उघड झाले. त्यानुसार मणियार यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.