जळगाव मिरर | १६ ऑक्टोबर २०२३
राज्यातील अनेक शेतकरी वेगवेगळ्या कारणाने चिंतेत असतांना राज्यातील कृषी मंत्री अनेक जिल्ह्याचा देखील आढावा घेत आहे. नुकतेच बीडमध्ये कृषी विभागाच्या आयोजित कार्यक्रमात कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारे वक्तव्य केल्याने राज्यात मोठी चर्चा सुरु झाली आहे.
मंत्री मुंडे म्हणाले कि, यंदाच्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा अग्रीम जमा करण्यात येणार आहे . जर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा अग्रीम जमा नाही झालं तर, मी देखील माझ्या घरात दिवाळी साजरी करणार नाही. असा शब्द आणि विश्वास देखील त्यांनी दिला आहे.
मुंडे म्हणाले की, आज जर शेतकरी संकटात असेल तर कृषीमंत्री म्हणून मी दिवाळी कशी साजरी करणार? मी देखील शेतकऱ्याचं पोरगा आहे. शेतकऱ्यांची काय अडचण आहे, हे मला चांगलं माहित आहे, जाणीव आहे. त्यामुळे कोणी वेगवेगळे प्रचार करतील, मोठमोठ्या सभेतून आरोप करतील, काय झालं पिक विम्याचे ? असं म्हणतील मात्र तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. असंही यावेळी धनंजय मुंडे म्हणाले.