
जळगाव मिरर | २८ नोव्हेबर २०२३
देशात लोकसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु असतांना राज्याचे भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी नुकतेच जागा वाटपाचे प्लान जाहीर केल्यानंतर आता त्यांनी पुन्हा बदल केला असल्याच्या चर्चा जोर धरू लागलेल्या आहे.
फडणवीस म्हणाले की, याबाबत मी आधीही स्पष्ट केले आहे. आता पुन्हा एकदा स्पष्ट करतो. आमच्या चर्चा अजून व्हायच्या आहेत. फॉर्म्युला चर्चेनंतरच ठरेल. पण जो ज्या जागा लढला आहे, त्या जागा त्याच्याकडे जाव्यात असा त्या चर्चेचा आधार असेल. पण याचा अर्थ ते static आहे असा नाही. तर त्यात आवश्यक ते बदलदेखील आम्ही आपापसात बसून बोलून करणार आहोत, असे स्पष्टीकरण फडणवीसांनी यावेळी दिले.
फडणवीस म्हणाले की, नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पार पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात होणार आहे. अधिवेशनानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या मतदारसंघनिहाय बैठका घेण्याचा आमचा विचार आहे. जर एखाद्या मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडणूक लढवत असेल, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्या उमेदवाराचा आपल्या पक्षाचा उमेदवार असल्याप्रमाणे प्रचार करतील. हा नियम भाजप कार्यकर्त्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांबाबतही लागू होईल.