जळगाव मिरर | ३१ ऑक्टोबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून महायुती, महाविकास आघाडी व मनसेने देखील राज्यातील अनेक मतदार संघात आपले उमेदवार जाहीर करून उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. मात्र जळगावात मनसेच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यापूर्वीच मोठी फुट शहरात पडली असल्याचे चित्र दिसून आले आहे.
जळगाव शहरात मनसे गेल्या अनेक वर्षापासून अनेक आंदोलन, उपोषण करीत नेहमीच विविध माध्यमातून चर्चेत येत आहे. मात्र विधानसभा निवडणुकीची वेळेस जळगाव मनसेत मोठी फुट पडल्याचे चित्र दिसून आले. मनसेने जळगाव मतदार संघासाठी नवखा उमेदवार दिल्याने अनेक कार्यकर्ते नाराज झाले होते तर गेल्या दोन आठवड्यापूर्वी शहरातील एका धार्मिक मंदिरावर अतिक्रमणांची कारवाई झाल्यानंतर मनसे आक्रमक होत आंदोलन केले मात्र या आंदोलनाची मनसेच्या राज्यातील नेत्यापर्यंत स्थानिक नेत्यांनी चुकीची माहिती पाठविल्याने आंदोलन करणारे मनसे कार्यकर्ते नाराज होत भाजपात पक्ष प्रवेश केल्याने जळगावच्या मनसेत फुट पडली आहे.
आंदोलन, उपोषण कार्यकर्त्याने अन उमेदवारी नवख्याला ?
गेल्या काही वर्षापासून मनसे पक्ष जळगावात मोठा व्हावा यासाठी पक्ष स्थापनेपासून अनेक कार्यकर्ते विविध आंदोलन, उपोषण करून पक्षाचे मोठे काम करीत आहे. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षातील दोन ते तीन पदाधिकारी निवडणूक लढविण्यास सज्ज असतांना देखील नवख्या उमेदवाराला उमेदवारी पक्षाने दिल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहे. म्हणजे मनसे पक्षात देखील कार्यकते केवळ आंदोलन, उपोषण करण्यापुरते मर्यादित राहिले का असा प्रश्न मनसे कार्यकर्त्यामध्ये उपस्थित होत आहे.