जळगाव मिरर | १२ फेब्रुवारी २०२४
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांवर विश्वास ठेवून.. व सबका साथ सबका विकास या मुलमंत्रावर चालताना जळगावातील सामाजिक कार्यकर्ते निलेश विश्वनाथ तायडे ( नीलू आबा ) यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश महामंत्री विक्रांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आला.
यावेळेस पक्षांचे जळगावचे खासदार उन्मेष पाटील, रावेर चे खासदार रक्षा ताई खडसे, जळगाव येथील आमदार राजू मामा भोळे, चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण, भुसावळचे आमदार संजय सावकारे, आमदार सुभाष भामरे, युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष राहूल लोणीकर डॉ. केतकी पाटिल,जळगाव ग्रामीण अध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर ,जळगाव शहर अध्यक्ष उज्वला ताई बेंडाळे , माजी उपमहापौर सुनील भाऊ खडके, रेमंड प्रशासन अधिकारी सुनिल पाटिल व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसोबत प्रवेश करण्यात आला यावेळी पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.