
जळगाव मिरर | ११ जुलै २०२३
शहरातील ज्योतीकृष्णा (जे. के.)इंग्लिश स्कूल व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात करण्यात आला आहे.
जळगाव-मोहाडी रोडवरील लांडोरखोरी उद्यान जवळ स्थित असलेल्या जे. के. इंग्लिश मेडीयम स्टेट बोर्ड स्कूल व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ तर्फे मंगळवार रोजी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यात देशी वृक्ष वड, पिंपळ, औदुंबर, करंज,काशिद व 20 बांबू चे झाड लावण्यात आली. या प्रसंगी शाळेतील विध्यार्थीसह प्रिन्सिपॉल ज्योती श्रीवास्तव, राज्य उपाध्यक्ष मनिषा पाटील, कामिनी मिस्त्री, सीमा जाधव ,प्रगती परदेशीं, रेणुका हिंगु, ललिता पाटील, राधिका पाटील,शशी शर्मा, पूनम पाटील, संगीता चौधरी, छाया शिरसाळे, वंदना मंडावरे, हर्षा गुजराती, शरयू पाटील, धनश्री देवरे, माधुरी मौर्या ,यश सोनार, स्वामी सोनार आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





















