जळगाव मिरर / ३ मार्च २०२३ ।
गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात चढउतार होताना दिसते आहे. त्यामुळे सोन्याच्या दरांकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. येत्या काही दिवसांवरच होळीचा सण उत्साहात साजरा होणार आहे. तेव्हा होळीच्या या मंगलमय मुहूर्तावर सोन्याचे दरही महागण्याची चिंता आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी सोन्याचे दर ही उतरती कळा घेत होते परंतु त्यानंतर सोन्याचे भाव अचानक वाढल्याचे दिसते आहे. त्यातून आता मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये तरी सोन्याचे दर हे स्थिर आहेत. या मार्च महिन्याच्या मध्यांकापर्यंत सोन्याचे दर वाढू शकतात. त्यामुळे कदाचित यावेळी तुम्हाला थोडंसं थांबावं लागणार आहे.
येत्या सिझननुसार, आजचे सोन्याचे दर काय असतील याकडे एक नजर टाकूयात या लेखातून. 10 ग्रॅम सोन्याच्या दरांची जर का पाहणी केली तर आज 22 कॅरेट (Standard Gold) सोनं हे 51,750 वर असून 24 कॅरेट (Pure Gold) सोनं हे 56,750 वर आहे. त्यामानानं 10 ग्रॅमच्या चांदीचे दर हे 665 रूपये आहे. कालच्या तारखेनुसार, 22 कॅरेट 1 ग्रॅम सोनं हे 30 रूपयांनी तर 8 ग्रॅम सोनं हे 240 रूपयांनी वाढले होते. त्याचसोबत 24 कॅरेट 1 ग्रॅम सोनं हे 31 रूपयांनी वाढलं होते आणि 8 ग्रॅम सोनं हे 248 रूपयांनी वाढले होते. मुंबईमध्ये 56,450 रुपये, पुणेमध्ये 56,450 रुपये, नागपूरमध्ये 56,450 रुपये तर महाराष्ट्राबाहेर लखनऊमध्ये 54,600 रुपये, कोलकत्तामध्ये 56,450 रुपये आणि दिल्लीमध्ये 56,600 रुपये इतके आहेत. 2 मार्चनुसार, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. 58,000 वरील सोनं हे 55,763 वर पोहचले होते. त्यातून चांदी हे काल 375 रूपयांनी वाढले होते त्याचसोबत आज 665 नं वाढलं आहे.
