
जळगाव मिरर | २० एप्रिल २०२६
नागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म रेसलिंग स्पर्धेसाठी निवड झालेल्या धुळे जिल्हा आर्म रेसलिंग संघातील खेळाडूंना शिरपूर येथील प्रसिद्ध ओम साई लॉन्ड्री अॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांच्या हस्ते क्रीडा साहित्य (स्पोर्ट्स किट) वाटप करण्यात आले.
जिल्हा निवड चाचणीतून एकूण ११ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सब ज्युनिअर मुली गटात ४० किलो वजन गटात बिजली पावरा, वजिता पाडवी, अनुष्का पावरा, ४५ किलो गटात प्रिती पावरा, खुशी पावरा तर ५० किलो गटात जान्हवी पावरा व निकिता पावरा यांचा समावेश आहे. ज्युनिअर मुलांच्या गटात ५० किलो वजन गटात पियुष मराठे, ५५ किलो गटात सम्राट परदेशी, ८० किलो गटात तनय चंदन यांची निवड झाली आहे. तसेच वरिष्ठ गटात ५० किलो वजन गटात तन्मय खैरनार यांची निवड करण्यात आली आहे.
या प्रसंगी श्री. जितेंद्र बोरसे यांनी खेळाडूंना उत्साहवर्धक मार्गदर्शन करत स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या या उपक्रमामुळे खेळाडूंमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली असून राज्यस्तरावर धुळे जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्याचा आत्मविश्वास वाढला आहे.
कार्यक्रमावेळी धुळे जिल्हा आर्म रेसलिंग संघटनेचे अध्यक्ष शकील कुरेशी, सचिव मोहसीन कुरेशी तसेच पदाधिकारी मयूर बोरसे, विजेंद्र जाधव, अमोल पवार, नूर तेली, लक्ष्मी भरसट आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.






















