
जळगाव मिरर | २६ एप्रिल २०२६
शहरातून नात्याला काळिमा फासणारा हा धक्कादायक प्रकार दि. ३० मार्च रोजी रात्री एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात उघडकीस आली आहे. घरी कोणीही नसतांना रात्रीच्या वेळी घरात घुसून १० वर्षीय अल्पवयीन मुलीचा तोंड दाबून तिच्या २६ वर्षीय चुलत भावानेच तिचा विनयभंग केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका कुटुंबातील १० वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात असताना रात्रीच्या वेळी तिच्या चुलत भावाने घरा प्रवेश केला. त्यानंतर दरवाजा लावून मुलीचे तोंड दाबले व तिचा विनयभंग केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला आणि तुझ्या भावाला मारून टाकेल, अशी धमकीदेखील तरुणाने दिली. यामुळे सदर मुलगी प्रचंड घाबरुन गेली होती. तीने हा प्रकार दि. २४ एप्रिल रोजी घरातील सदस्यांना सांगितले. त्या वेळी तिच्या वडिलांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्याद दिली. त्यावरून तरुणाविरुद्ध विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक माधुरी बोरसे करीत आहेत.





















