भडगांव : महेश पाटील
भडगांव शहर व नगरपरिषद हद्दीत विविध समस्या व असुविधांना प्रशासकीय काळात नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. याकडे मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांनी लक्ष्य द्यावे. यासाठी दक्षता समिती अध्यक्षा तथा माजी नगरसेविका योजनाताई पाटील, उपाध्यक्षा मिना बाग, सदस्या रेखा पाटील, सुषमा भावसार आदि महिलांनी निवेदन दिले.
निवेदनात तळणी परिसरासह इतर भूखंड विकसित कामे इस्टीमेट तसेच क्वलिटीनुसार व्हावेत. पावसाळ्यादरम्यान साचलेले पाणी, झाडे- झुडपे काढणेसाठी स्वच्छ्ता अभियान राबवावे. गटार साफ सफाई स्वच्छ्ता करून डेंगू, हिवताप इ. साथीचे रोग प्रतिबंध फवारणी करावी. घरकुल योजनेचे धनादेश लाभार्थीना त्वरित मिळावेत. शुद्ध पाणीपुरवठा वेळेवर व नियमित होणेसाठी नियोजन करावे. पर्यावरण संरक्षणासाठी वॄक्षारोपण संगोपण व्हावे. टोणगांव व भडगांव स्मशानभूमी मार्ग नाल्यावर पाइप फरशी काढून उंचपुल होणेकामी त्वरित पाठपुरावा व्हावा यासह विविध कामे संदर्भात मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांचे माजी नगरसेविका योजना पाटील सह सदस्यांनी लक्ष्य वेधले आहे.