जळगाव मिरर | २४ ऑक्टोबर २०२५
जळगाव जिल्ह्याच्या प्रशासनात मोठे बदल झाल्यानंतर अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील झाले आहे. त्यानंतर आता जळगाव जिल्हाधिकारी पदावर रोहन घुगे यांची नियुक्ती होऊन त्यांनी कार्यभार देखील हाती घेतला आहे. मात्र जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील एक कर्मचाऱ्यांची नाशिक येथे बदली मिळावी यासाठी जोरदार फील्डिंग लावत असल्याची चर्चा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे
जळगाव जिल्हाधिकारी पदावर रोहन घुगे यांनी पदभार घेतल्यानंतर त्यांनी सर्वच विभागाचा आढावा देखील घेतला आहे. काही प्रमाणात जिल्हाधिकारी रोहन घुगे ॲक्शन मोडवर देखील आल्याचे दिसून आले आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातील एक महत्त्वाचा कर्मचारी स्वतःची नाशिक येथे बदली व्हावी यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग लावत नाशिक जाण्यासाठी अट्टाहास केला असल्याची चर्चा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कर्मचारी व अधिकारी वर्गात जोरदार सुरू झाली आहे त्यामुळे आगामी काळात या कर्मचाऱ्याला नाशिक येथे जाण्यास मिळते की जळगाव जिल्ह्यातील एक छोट्या-मोठ्या गावात त्याची बदली होते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील एका महत्त्वाच्या पदावर हा कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून विराजमान आहे. अनेक छोट्या मोठ्या घडामोडीत हा कर्मचारी नेहमीच वादात सापडत असतो मात्र या कर्मचाऱ्यांच्या मागे मोठे आशीर्वाद असल्याने हा कर्मचारी सही सलामत बाहेर पडतो. मात्र आता जळगाव जिल्हा प्रशासनात मोठे बदल झाले व जिल्हाधिकारी पदी रोहन घुगे यांनी पदभार सांभाळल्यानंतर त्या कर्मचारीच्या अनेक आलेल्या तक्रारींमध्ये आता या कर्मचाऱ्यांची सुट्टी मिळणार नाही. त्यामुळे तो कर्मचारी स्वतःहून आपली बदली नाशिक करण्यासाठी अट्टाहास करीत आहे. मात्र आता जिल्हाधिकारी रोहन घुगे साहेबांनी त्या कर्मचाऱ्यांची बदली जिल्ह्यातील एका छोट्या मोठ्या गावात करून त्या कर्मचाऱ्याच्या विरोधात आलेल्या तक्रारी स्वतः लक्ष देऊन निकाली काढाव्यात याच अपेक्षा जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती.





















