जळगाव मिरर | २५ ऑगस्ट २०२३
महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या दर्जी फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांनी एम.पी.एस.सी.परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर निरीक्षक अर्थात एस.टी.आय. पदासाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल यापूर्वी जाहीर झालेला होता. या परीक्षेतील प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची निवड नुकतीच जाहीर झाली. यात मनिषा अण्णासाहेब खेडकर व आकाश नामदेव म्हेत्रे यांची एस.टी.आय. पदासाठी यशस्वी निवड झालेली आहे.
तसेच सहाय्यक कक्षाधिकारी पदासाठीची प्रतिक्षा यादी देखील जाहीर झालेली असून यात सुप्रिया दिलीप चव्हाण या विद्यार्थीनीची निवड झालेली आहे.पूर्व परीक्षेसह मुख्य परीक्षेचे गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन जळगांव शहरात मिळत असल्यामुळे केवळ खान्देशातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील विद्यार्थीदेखील दर्जी फाऊंडेशनच्या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेत आहेत. याच गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनामुळे यापूर्वी पी.एस.आय.पदासाठी दर्जी ङ्गाऊंडेशनच्या 81 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. एस.टी.आय.व ए.एस.ओ. पदासाठी निवड झालेल्या मनिषा खेडकर, आकाश म्हेत्रे व सुप्रिया चव्हाण यांचे यश हे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे असून यामुळे दर्जी फाऊंडेशनच्या यशाच्या गुणवत्तेचा आलेख वाढलेला आहे. भविष्यातही जास्तीत जास्त विद्यार्थी कसे यशस्वी होतील यासाठी विविध मार्गदर्शन वर्गांचे आयोजन 1 सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत. तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील पी.एस.आय. साठी 3000 पदे रिक्त असून यासाठी देखील लवकरच परीक्षेचे नियोजन केले जाणार आहे. यशासाठी प्रयत्न करणार्या विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन सौ.ज्योती दर्जी यांनी केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रा.गोपाल दर्जी यांच्यासह सौ.ज्योती दर्जी यांनी अभिनंदन केले.
