जळगाव मिरर / १२ फेब्रुवारी २०२३
जिल्ह्यातील वाळू माफियांची दंबगगिरी मोठ्या प्रमाणात वाढत असताना दिसून येत आहे. एका तालुक्यातील गावाजवळील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाईसाठी गेले असतांना चालकाने वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेवून पसार झाला. याप्रकरणी शनिवारी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील लमांजन गावातील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक शनिवारी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी होत असल्याची माहिती तलाठी प्रकाश जामोदकर यांना लमांजन गावचे पोलीस पाटील भावसार आधार पाटील यांनी दिली. त्यानुसार कारवाई करण्याचे सुचना तलाठी जामोदकर यांनी पोलीस पाटील यांनी दिले. त्यानुसार कारवाई करण्यासाठी गेलेले पोलीस पाटील, भावराव पाटील यांना चकवा देवून ट्रॅक्टर चालक सोपान अशोक पाटील रा. लमांजन ता. जि.जळगाव हा वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेवून पसार झाला. याप्रकरणी पोलीस पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालक सोपान पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.