जळगाव मिरर / ३० एप्रिल २०२३ ।
जळगाव बाजार समितीचा निकाल आज समोर आलेला आहे. यात महाविकास आघाडीने आपले वर्चस्व सिद्ध केले असून शहर मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे देखील बाजार समितीच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. आज सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली होती.
शहर मनपात विरोधी पक्षनेते म्हणून काम करणारे सुनील महाजन यांनी यंदाची जळगाव तालुक्याची बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी करीत त्यांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला ११, भाजप व शिंदे गट ६ तर अपक्ष एक असे उमेदवार निवडून आले आहे. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवार सुनील महाजन यांनी ढोल ताश्याच्या गजरात गुलालाची उधळण देखील केल्याची चित्र दिसून आले आहे. तर या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना मोठा धक्का मानला जात आहे. धरणगाव – एरंडोल बाजार समितीचा देखील निकाल काही वेळेत समोर येणार आहे. आता पर्यत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.