अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर शहरासह तालुक्यात गुन्हेगारांनी केलेल्या गुन्ह्यांमध्ये अचूक तपास केल्याने अमळनेर पोलीस स्टेशनच्या चार अधिकाऱ्यांसह सतरा कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधिक्षकांतर्फे जिल्हा गुन्हे आढावा बैठकीत प्रमाणपत्र व बक्षीस देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या कर्मचाऱ्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी सुमारे पाच लाख रुपये किमतीचे साबण असलेला विप्रो कंपनी चा ट्रक देशातील सराईत गुन्हेगारांनी लंपास केला होता. आरोपींचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक माहीत नसताना अगदी छोट्या माहितीवरून आरोपी पकडले, जानवे गावाजवळ पेट्रोलपंपावर पिस्तुल दाखवून लूटमार करणारा गुन्हेगार राज्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असतांना त्याच्यावर झडप घालून पकडण्यात यश पोलीसाना आले. म्हणून जिल्हा गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे, पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख, शरद पाटील, सुनील हटकर, निलेश मोरे योगेश महाजन, अमोल पाटील, श्रीराम पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू साळुंखे, हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील, पोलीस नाईक मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंखे, नाईक रवींद्र पाटील, दीपक माळी, उज्वल पाटील यांचा प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.