
जळगाव मिरर | २४ एप्रिल २०२६
अमळनेर तालुक्यातील करणखेडा येथे घरात एकटी असलेल्या १८ वर्षीय तरुणीच्या घरात जबरदस्तीने घुसून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात १८ वर्षीय तरुणी राहत असून दि. २० रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास ती घरी एकटीच होती. त्यावेळी संशयित धीरज पाटील हा जबरदस्तीने घरात शिरला. त्याने तरुणीचे तोंड दाबून शिवीगाळ करत आरडाओरड केल्यास जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. यानंतर त्याने तरुणीसोबत अश्लिल वर्तन करीत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून धीरज पाटील याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल शरीफ पठाण करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.





















