जळगाव मिरर | १ जून २०२५
तरुणाला सोबत घेवून येत त्याला रस्त्यावर पाडून लाथाबुक्क्यांसह दगडाने मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. २८ रोजी दुपारच्या सुमारास कुसंबा ते नेरी कडे जाणाऱ्या रोडच्या पुलाजवळ घडली. याप्रकरणी संशयित मुकेश कोळी याच्यासह त्याच्या साथीदाराविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील इंदिरा नगरात भाईदास सकस गायकवाड (वय ३३) हा तरुण वास्तव्यास आहे. दि. २८ रोजी दुपारच्या सुमारास संशयित मुकेश कोळी याने त्याला नेरी कडे जाणाऱ्या रोडवरील पुलाजवळ आणले. त्याठिकाणी रस्त्यावर पाडून भाईदास गायकवाड याला त्याच्या साथीदारासह लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच हातात दगड घेवून तरुणाच्या दोन्ही पायांवर कपाळावर व छातीवर मारुन गंभीर जखमी केले. भाईदास गायकवाड याने दिलेल्या तक्रारीवरुन संशयित मुकेश कोळी व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ मुकुंद पाटल करीत आहे.




















