जळगाव मीरर । ११ जुलै २०२३
जळगाव शहरातील श्री.समस्त जळगांव बारी पंच व बारी समाज महिला मंडळातर्फे जळगांव जिल्ह्यातील बारी समाजातील इ.१० वी व इ.१२ वी ६०% च्या वर गुण असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला असून हा कार्यक्रम दि.०६ ऑगष्ट २०२३ वार-रविवार रोजी सकाळी १० वाजता दीपलक्ष्मी मंगल कार्यालय घन:श्याम नगर,खोटे नगर बस स्टॉप जवळ जळगांव येथे होणार आहे. तरी आपल्या गुणपत्रिकेची प्रत्यक्ष झेरॉक्स प्रत दि.१५ जुलै पर्यंत गुरुकुल कॉम्प्यूटर्स ७ भायजी शॉपी,का.ऊ.कोल्हे विद्यालयाजवळ,जळगांव येथे किंवा महेंद्र बारी सर -९८५००७७६२३ या (व्हाटसअप) क्रमांकावर अथवा बारी समाजाच्या baripanchjal@gmail.com या ई-मेल आय डी वर स्पष्ट PDF स्वरूपात पाठवावी. तरी समाजबांधवांनी आपल्या पाल्यांसह कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री.समस्त जळगांव बारी पंच व बारी समाज महिला मंडळातर्फे करण्यात आले आहे.