जळगाव मिरर | १० नोव्हेबर २०२३
गेल्या काही वर्षापासून अनेकांचा महामार्गावरील अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच मुंबई शहरातील वरळी सी लिंकवरील टोल नाक्यावर एक भीषण अपघात गुरुवारी घडल्याचे समोर आले आहे.
टोल नाक्यावर उभ्या असलेल्या सहा ते सात वाहनांना भरधाव कारने मागून येत जोरदार धडक दिली आहे. हि घटना रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या भीषण अपघाताचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, वरळीहून वांद्र्याच्या दिशेने भरधाव वेगात आलेली एक इनोव्हा कारने सी लिंकवरून जात असलेल्या एका कारला धडक दिली. अपघातानंतर इनोव्हा कारच्या चालकाने कार दामटवली. वेग जास्त असल्याने इनोव्हा कारने टोलनाक्यावर उभ्या असलेल्या ६ वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा ते सात जण जखमी झाले.
वांद्रे वरळी सी लिंकवर भीषण अपघात, कारचालकाने ६ ते ७ वाहनांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी #Mumbai #Worali #accident #Police #MumbaiPolice pic.twitter.com/wKlsWJyyxC
— Satish Daud (@Satish_Daud) November 10, 2023
तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये इनोव्हा कारच्या चालकाचा देखील समावेश आहे. अपघातानंतर वांद्रे सी लिंकवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. रात्री उशीरापर्यंत कारचालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.