जळगाव मिरर | १० ऑक्टोबर २०२४
शहरातील शेरा चौकात हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या शैबाज शेख बाबू शेख (वय २०, रा. मास्टर कॉलनी) याच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून धारदार पाते असलेली तलवार जप्त केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील तांबापूरा परिसरातील शेरा चौकात कोणीतरी भर दिवसा हातात तलवार घेवून दहशत माजवित असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोहे कॉ रामकृष्ण पाटील, गणेश ठाकरे, साईनाथ मुंडे, योगेश घुगे यांचे पथक रवाना झाले. या पथकाने हातात तलवार घेवून आरडाओरड करीत दहशत माजविणाऱ्या शैबाज शेख बाबू शेख याच्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून धारदार पाते असलेली तलवार जप्त केली असून त्याच्याविरुद्ध योगेश घुगे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहे कॉ रामकृष्ण पाटील हे करीत आहे.