अमळनेर : विक्की उत्तम जाधव
दिनांक २६ सप्टेंबर २०२३ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर यांनी मुख्याधिकारी श्री प्रशांत सरोदे यांची भेट घेऊन त्यांना नगरपरिषद अमळनेर हे अनेक वर्षापासून नागरिकांकडून लोक वर्गणी चे नावाखाली कर आकारित आहे. सदर हा कर बेकायदेशीर असून ते रद्द करावे व पाणीपट्टी कर व घरपट्टीवर करावर सुद्धा १ ऑक्टोबर२०२३ पासून दोन टक्के व्याजदर लावण्यात येणार असल्याचे समजते ते सुद्धा रद्द करावे अशी जोरदार मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर केलेली आहे.
सदर ग्राहक पंचायत अमळनेरने नगर परिषदेकडे विचारलेअसता नगर परिषदेला सदर करांवर व्याज किंवा दंड लावण्याच्या अधिकार आहे. परंतु याबाबतीत ग्राहक पंचायतीने मागणी केली असता त्यांच्याकडे कोणतेही प्रकारचे शासनाचे परिपत्रक किंवा सर्क्युलर आलं नसल्याचे समजते. सदर व्याजदर सुरू केल्यास सर्वसामान्य जनतेला व आर्थिक दुर्बल घटकांना मोठ्या प्रमाणावर याचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार असल्याचे समजते.
त्यामुळे त्यांनी लावण्यात येणारा व्याजदर व लोक वर्गणी सुद्धा रद्द करावी अशी जोरदार मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर तर्फे अध्यक्ष एडवोकेट भारती अग्रवाल, जिल्हा सहसंघटक मकसूद बोहरी , जिल्हा सायबर व बँकिंग प्रमुख विजय शुक्ल व जिल्हा ऊर्जा प्रमुख सुनील वाघ यांनी केले आहे. मुख्याधिकारी यांनी सदर लोकवर्गणी ३१ मार्च २०२४नंतर अमळनेर नगरपरिषद घेणार नसल्याचे त्यांनी आश्वासन दिले. सदर बातमी पीआरओ जयंतीलाल वानखेडे कळवितात.