जळगाव मिरर | २८ एप्रिल २०२४
महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला वेग आला असून रविवार, दि.२८ रोजी जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. राजमालतीनगर, दूध फेडरेशन परिसर, इंद्रप्रस्थनगर, श्री लक्ष्मीनगर, छत्रपती शिवाजी नगर, गेंदालाल मिल आदी भागातून ही प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद लाभला. नागरिकांचा लाभलेला प्रतिसाद पाहून ही प्रचार रॅली विजयी रॅलीच वाटत होती. नागरिकांनी ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि घरा-घरांवरून फुलाची उधळण आणि ‘करणदादा पाटील यांचा विजय असो’च्या घोषणा देत करणदादा पाटील यांचे स्वागत केले.
जळगाव शहरातील राजमालतीनगरातील श्री हनुमान मंदिर आणि जिल्हा दूध संघासमोरील साईबाबा मंदिरात नारळ ओवाळून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. राजमालतीनगर, दूध फेडरेशन परिसर, महावीर नगर, राधाकृष्ण नगर, भारतनगर, इंद्रप्रस्थ नगर, श्री लक्ष्मी नगर, छत्रपती शिवाजी नगर, खडके चाळ मार्गे गेंदालाल मिल आदी भागातून प्रचार रॅली काढण्यात आली आहे. त्यानंतर रेल्वे स्टेशनजवळील मौला अली मुश्किल कुशा बाबा दर्गा येथे प्रार्थना करून रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅली दरम्यान, परिसरातील नागरिक, युवक, माता भगिनी यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघात ‘मशाल’ पेटवून करणदादा पाटील यांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करू असा निर्धार केला.
जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी एकदा संधी द्या : करणदादा पवार
रॅलीदरम्यान, महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी, या भागातील नागरिकांच्या भेटी घेऊन ‘मशाल’ चिन्हासमोरील बटन दाबून जळगावच्या सर्वांगीण विकासासाठी एकदा संधी द्यावी, असे आवाहन करून सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू आश्वासन दिले.
याची होती उपस्थिती
रॅलीत, जळगावच्या माजी महापौर जयश्री महाजन, माजी महापौर तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, गणेश गायकवाड, राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष राजेश पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंगलाताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, भारत मुक्ती मोर्चाचे मुकुंद सपकाळे, डेबुजी फोर्सचे अध्यक्ष सागर सपके, माजी नगरसेवक सुनील माळी, पार्वताताई भिल, प्रा. अस्मिता पाटील, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष अमृता नेरकर, शहराध्यक्ष दीपक माने, सचिव राजू निकम, उपाध्यक्ष सिमा बिर्ला, कोषाध्यक्ष सुनील निकम, सहसचिव सागर निकम, निर्मला निकम, शिवसेनेचे विभाग प्रमुख अण्णा भोईटे, ज्येष्ठ नेते सुभाषजी सांखला, निलेश मिश्रा, विजय कोळी, शरद बारी, रितेश बाविस्कर, माजी नगरसेवक इब्राहिम पटेल, शकील बागवान, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गौरव वाणी, रहीम तडवी, गोकुळ चव्हाण, माजी नगरसेवक राजू मोरे, शहर उपाध्यक्ष किरण राजपूत, श्रीकांत आमले, नीता सांगोळे, छाया कोळी, योगिता शुक्ल, अमीना तडवी, मीना जावळे, सरिता नेरकर यांसह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.