
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर शहरातील पू. सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचालित पू. सनेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून गेल्या काही वर्षा पासून वाचनालया मार्फत मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवले जात असुन शैक्षणिक क्षेत्रतील दिग्गज शिक्षक दर रविवारी मोफत मार्गदर्शन करत असुन आता पर्यत 90 पेक्षा जास्त विद्यार्थी अधिकारी झाले असुन 12 वर्षात कोरोना सोडला तर सतत हा यज्ञ चालूचं आहे. आत अजून काही 7 ते 8 विध्यार्थी लिपिक म्हणून नियुक्ती च्या प्रतीक्षेत आहेत तर काहींच्या नियुक्ती झाल्या आहेत.
यशस्वी झालेले विद्यार्थी
दिनेश भारत चौधरी यांची BSF म्हध्ये नुकतीच नियुक्ती झाली असुन भैयासाहेब अहिरराव यांची देखील मुंबई पोलीस मध्ये नियुक्ती आहे. जितेंद्र गजमल पवार मंत्रालय लिपिक, विनोद भास्करराव पाटील मंत्रालय लिपिक, चंद्रशेखर आजलराव पाटील मंत्रालाय लिपिक, प्रकाश पाटील सर, यांनी आपल्या दिव्यागांवर मात करत सेट परीक्षा उत्तीर्ण केली असुन समाजात पुढे त्यांनी एक नावा आदर्श निर्माण केला आहे. यातील उदय अरुण सोनार आणि दानेश अरुण सोनार, हे सक्खे भाऊ खडतर परिस्थितीवर मात करत, उदय मंत्रालय लिपिक तर दानेश PSI मेन्स परीक्षा उत्तीर्ण झाला असुन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यावेळी डी वाय एस पी. नांदळवळकर यांनी विद्यार्थी सोबत बोलतांना छंद म्हणून नव्हे तर पोटाची खडगी भरण्यासाठी MPSC करा. असे DYSP नांदलवळकर यांनी बोलून दाखवले. पुढे तें म्हणाले. आज चा दिवस माझ्या आयुष्यात..! मी तरी नाही विसरणार. माझा रविवार सु:खद गेला. कोणतीही गोष्ट सहज होत नाही त्या मागे काही तरी कारण नक्कीच असते. प्रयत्न करणे सोडू नका कनेक्टीव्हिटी ही खूप महत्वची असते. आणि मीच, तो ना’ लायक. ह्या त्यांच्या थीम ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कोणतीही गोष्ट कनेक्ती व्हिटी शिवाय शक्य नाही.असे नांदलवळकर म्हणाले.
यावेळी एस आर चौधरी सर, प्रकाश वाघ सर, दिलीप सोनवणे, शाम पवार सर, भाऊसाहेब देशमुख, ज्ञानेश्वर पाटील सर, प्रा. अतुल सूर्यवंशी, चंद्रकांत देसले, विजय मोरे, किरण पाटील सर, दीपक वाल्हे सर, बडगुजर सर, धिंगराव जाधव, सुमित भाऊ, बापू नागावकर, भावसार सर, इ उपस्थित होते. अध्येक्षीय भाषण शामकांत भानुदास भदाणे यांनी केले. सूत्रसंचालन विजय पवार सर यांनी केले.





















