जळगाव मिरर / ४ मार्च २०२३ ।
जळगांव महाननिर्माण सेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस तथा जनहित आणि विधी विभाग प्रदेशाध्यक्ष किशोर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जनहित विधीकल प्रदेश सरचिटणीस राकेश पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे दिनांक ३ मार्च रोजी जळगाव जिल्हा जनहित व विधी विभाग पदाची निवड जाहिर करण्यात आली.
यामध्ये जनहित विभाग जिल्हा उपघटक म्हणून राजेंद्र निकम यांची निवड करण्यात आली जनहितविभाग, महानगर संघटक म्हणून प्रशांत बाविस्कर जनहित विभाग, उपशहर संघटक म्हणून किरण सपकाळे, जनहित विभाग जळगांव तालुका उपसंघटक म्हणून विकास पावला तर विधी विभागाचे गांव तालुका सचिव पदी किशोर खलसे, तर विधी विभागाचे शहरसचिव पदी सागर शिपी यांची निवड केली. मान्यवरांचे हस्ते करण्यात येऊन सर्वांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येऊन सर्वांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहे.