जळगाव मिरर | १ फेब्रुवारी २०२४
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात दि.१ फेब्रुवारी रोजी रास्ता रोको करीत आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट्रात सर्व सामान्य नागरिकांचे हिताचे मुद्दे घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष आमदार श्री जयंत पाटील साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा नेते आमदार रोहित दादा पवार हे सतत लढत असल्याने आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठवून झोपेचे सोंग घेण्याच्या केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य हे ईडी कार्यवाही व धाक दाखवून विरोधी पक्षाच्या नेत्यांचे खच्चीकरण करून या विरोधात आकाशवाणी चौक येथे राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून रस्ता रोको करण्यात आला यावेळेस सरकार हमसे डरती है ईडिको आगे करती है. या ईडी सरकारचा निषेध असो, केंद्र सरकार , महाराष्ट्र सरकार धिक्कार असो आकाशवाणी चौक व जिल्हाधिकारी कार्यालय घोषणा देऊन दणाणे सोडला असे विविध घोषणा करण्यात आल्या.
जिल्हा कार्यालय व आकाशवाणी चौक येथे रस्ता रोको करून हे आंदोलन करण्यात आले तसेच शेतकऱ्यांना आतापर्यंत कोणतेही नुकसान भरपाई पिक विमा,कापसाला हमीभाव ,सोयाबीन, तूर,कांदा निर्यात बंदी शैक्षणिक संस्थांचे खाजगीकरण युवकांना नोकरी नाही. पेट्रोल,डिझेल,गॅस,भाव वाढ अधि विषयांवर आंदोलन करण्यात आले हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील व महानगर जिल्हाअध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
या आंदोलनास इजाजभाई मलिक , उमेश पाटील , रिकू चौधरी , वंदनाताई चौधरी , मंगलाताई पाटील , विकासदादा पवार , वाल्मिकमामा पाटील,वाय एस महाजन सर, अशोक पाटील,इब्राहिम तडवी सर , प्रतिभाताई शिरसाट , राजुभाऊ मोरे , नामदेवभाऊ वाघ , किरणभाऊ राजपूत , डॉ संग्रामसिग सुर्यवशी , डॉ रिजवान खाटीक , अशोकभाऊ सोनवणे , रमेशभाऊ पाटील , अकबर खान , सलिमभाई ईमानदार , हूसेनभाई शेख , रहिमभाई तडवी , अमोलभाऊ कोल्हे , नंईमभाऊ खाटीक , रमेशजी बारे , भाऊसाहेब इगळे , ॲन्ड राजेश गोयल , सौ वर्षाताई राजपूत , शालिनीताई सोनवणे , सौ शितलताई मशाणे , हरशालाताई पाटील ,जयप्रकाश चांगरे , मतिन सैय्यद , अनिलभाऊ पाटील , चेतनभाऊ पवार , आकाशभाऊ हिवाळे , धवनभाऊ पाटील , अनिरुद्ध जाधव , रफिकभाई शहा , आयाजभाई शेख , पंकजभाऊ तनपुरे , महाडीक सर , संजयभाऊ चौव्हाण , बंशीरभाई शहा , हरुणभाई शेख इतर पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते.