जळगाव मिरर | १० मार्च २०२५
राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून यात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करत आहेत. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी यासंदर्भातील घोषणांकडे सर्वांचे लागले असताना अजित पवारांनी राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या पाच वर्षात राज्यातील वीजदर कमी होणार असल्याची महत्वाची घोषणा केली.
राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी,” महावितरण कंपनीने येत्या 5 वर्षांसाठी वीजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे” अशी माहिती दिली. तसेच ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये १ लाख १३ हजार कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज असल्याचे त्यांनी म्हटले . तसेच यामुळे, राज्यातील औद्योगिक वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी होतील असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.
राज्याचे अर्थसंकल्प सादर करताना सुरुवातीला अजित पवारांनी राज्याच्या शाश्वत विकासाचा रुपरेषा हातात घेण्यात आली आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. ” अशी माहिती सभागृहाला दिली. तसेच अर्थसंकल्प सादर करताना “छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज सर्व महा मानवांना अभिवादन करतो हे वर्ष अनेक दृष्टीने विशेष आहे. ताराराणी यांच जन्मवर्षे आहे, अहिल्याबाई होळकर यांचं जन्मवर्ष आहे. तसेच नोव्हेंबर 2024 झालेल्या विधानसभा निवडणूकीत जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे” असे अजित पवार यावेळी म्हणाले.
1 फेब्रुवारी रोजी केंद्र शासनाने कर मध्य सवलत दिली आहे.लाडक्या बहिणी मिळाल्या… धन्य झालो… विकासाची कामं केली म्हणून आम्ही पुन्हा आलो. 2047 पर्यंत भारताला विकसित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्येय ठेऊन आहेत.शाश्वत विकासाची रूपरेषा पुढे घेऊन आम्ही चालत आहोत महाराष्ट्र आता थांबणार नाही.थेट गुंतवणूक राज्यात आता केली जात आहे.” अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.