
जळगाव मिरर / ८ जानेवारी २०२३
घरातली जेष्ठ मंडळी नेहमी एक वाक्य सारखं बोलून दाखवतात ते म्हणजे ‘ऐकावं जनाचं करावं मनाचं’ ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. म्हणजे सर्वांचं ऐका पण तुमच्या मनाला पटेल तेच करा. पण तरी देखील काही मंडळी मित्र-मंडळींच्या नादाला लागतात अन् नको ते करून बसतात. असाच एक गंमतीशीर व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. नवरदेव मित्रांचं ऐकून असं काहीतरी करायला गेला की त्याची लग्नमंडपातच फजेती झाली. सर्व पाहुणे त्याच्याकडे आश्चर्यानं पाहू लागले. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्हाला देखील हसू आवरणार नाही.
भारतीय लग्न म्हटलं की, लग्नात नवरीच्या लहान बहीण व भाऊ हे नवरदेवाची मस्करी करण्याची कुठलीच संधी सोडत नाही. तर नवरदेवाचे मित्र हि व्यासपीठावर नवरीची मस्करी करण्याची कुठलीही कसर सोडत नाही. लग्नाच्या अशा अनेक व्हिडीओ क्लिप्स तुम्ही पाहिल्या असतील ज्यामध्ये नवरा-नवरी भलतंच काहीतरी करताना दिसतात. असाच एक व्हिडीओ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर त्याचं झालं असं की, नवरा आणि नवरी स्टेजवर उभे आहेत. तेवढ्यात नवरदेवाला त्याचे मित्र इशारा करतात की नवरीला उचलून घे. मग काय मित्रांचं ऐकून नवरदेव बायकोला उचलायला जातो. पण बायकोचं वजन त्याला काही पेलवत नाही. अखेर तो आणि त्याची बायको दोघंसुद्धा स्टेजवरून खाली कोसळतात. आपली फजेती झाली आहे हे लक्षात येताच मग नवऱ्याचा सुद्धा हिरमोड होतो.
https://twitter.com/HasnaZarooriHai/status/1609782936307650561?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1609782936307650561%7Ctwgr%5E08f30dc6ff1caf0c1e83e1da43ef398019a7ba65%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmaharashtratimes.com%2Fmaharashtra%2Fahmednagar-news%2Fahmednagar-crime-news-lady-police-contable-archana-kasar-ends-life%2Farticleshow%2F96831553.cms
हा व्हिडीओ @HasnaZarooriHai या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १४ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्या बिचाऱ्या नवऱ्याची फिरकी घेतली आहे. “अनुकरण करणं अंगलट आलं, उगाचच शायनिंग मारायला जाऊ नका, आपला देश कुठे चालला आहे?” अशा गंमतीशीर प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या जात आहेत.





















