मेष : ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. तुमचे संपर्कक्षेत्र मजबूत करा. तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळू शकेल. घरातील सुखसोयींशी संबंधित कामांमध्येही तुमचे महत्त्वपूर्ण योगदान असेल. काही कामात व्यत्यय आल्याने तुम्ही अस्वस्थ व्हाल. घराच्या व्यवस्थेवरही परिणाम होईल. व्यवसायाच्या ठिकाणी केलेल्या कामात चांगली सुधारणा होऊ शकते.
वृषभ : आज तुम्ही तुमच्या कार्याला नवीन स्वरुप देण्याचा विचार कराल. उधार दिलेले पैसे परत मिळाल्यास दिलासा मिळेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये काही वाद होऊ शकतात. त्यामुळे तणावाचे वातावरण असेल. संयमाने परिस्थिती हाताळा. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची चिंता राहिल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाने वेळ जाईल.
मिथुन : आज सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. समविचारी लोकांशी संपर्क साधणे तुमच्यासाठी आनंददायी असू शकते. घरातील सुखसोयींशी संबंधित साहित्य खरेदीवर खर्च कराल. एखादी महत्त्वाची वस्तू हरवण्याची किंवा चोरी होण्याचीही शक्यता आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
कर्क : घरातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने जुने संबंध सुधारतील. पैशाशी संबंधित कामे सकारात्मक होतील. तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सकारात्मक वाटेल. भावनिक होण्याऐवजी व्यावहारिक व्हा अन्यथा लोक तुमचा गैरफायदा घेऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. पती-पत्नीच्या नात्यात मतभेद निर्माण होण्याची शक्यता.
सिंह: मित्र किंवा सहकाऱ्यांशी फोनवर केलेले महत्त्वाचे संभाषण फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला तुमच्या समस्येवर तोडगा सापडेल. तुम्ही तुमची कार्ये आत्मविश्वासाने पार पाडाल. दिवसाच्या दुसऱ्या भागात सावध राहण्याची गरज आहे. तुमच्यासमोर अचानक काही अडचण येऊ शकते. अतिआत्मविश्वास आणि अहंकार तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतात. कार्यक्षेत्रात कामाचा ताण वाढेल.
कन्या : आज ग्रहस्थिती खूप सकारात्मक असेल. आर्थिक बाबतीत तुम्हाला यश मिळेल. कामाच्या योजनाही यशस्वी होतील. मालमत्तेसंबंधी किंवा कुटुंबाशी संबंधित एखादे रखडलेले प्रकरण सुटेल आणि कुटुंब सुखी होईल. उत्पन्न आणि खर्चामध्ये योग्य संतुलन ठेवा. आर्थिक स्थितीशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक व्यवहारांशी संबंधित क्रियाकलापांमध्ये सावधगिरी बाळगा.
तूळ : कुटुंबात सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्य त्यांच्या वैयक्तिक कामांवर लक्ष केंद्रित करू शकतील. विद्यार्थ्यांना यश लाभेल. ऑफिसमध्ये तुमच्याकडे अतिरिक्त काम असू शकते. कौटुंबिक आणि व्यावसायिक कामांमध्ये सुसंवाद राखाल.
वृश्चिक : ग्रहस्थिती तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढवेल. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम असाल. घरामध्ये काही धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याची योजना असेल. इतरांच्या कामात हस्तक्षेप करु नका. रागावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही व्यवस्थेबाबत निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. वैवाहिक जीवन आनंदी होऊ शकते. रक्तदाबाचा त्रास असणार्यांनी विशेष काळजी घ्यावी.
धनु : समविचारी लोकांशी झालेली भेट आज तुम्हाला आनंद देईल. कोणतेही सरकारी कामात अडकू नका. घरी अचानक पाहुण्याचे स्वागत होईल. आर्थिक स्थितीत थोडीशी धावपळ झाल्याने तुम्ही त्रस्त व्हाल. नवीन व्यवसाय सुरू करण्याबाबत वेळ अनुकूल आहे.
मकर : आज दिवसाची सुरुवात चांगली होईल. महत्त्वाच्या योजनांकडे लक्ष द्या आणि त्यावर ताबडतोब कामाला लागा. काहीवेळा मेहनतीचे अपेक्षित फळ मिळणार नाही; पण तो फक्त तुमचा अंदाज आहे. संयमाने समस्येवर मात कराल. व्यवसायात धावपळ होईल. वैवाहिक नात्यात गोडवा राहील.
कुंभ : आजचे ग्रहमान तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करत आहे. कर्तृत्वाने आणि कौशल्यामुळे तुम्ही समाजात मानाचे स्थान प्राप्त कराल;पण भावनेच्या आहारी जावून कोणताही निर्णय घेऊ नका. प्रिय व्यक्तीकडून काही अशुभ बातमी मिळाल्याने मन निराश होईल. तरुणांनी त्यांच्या करिअरचे नियोजन सुरू करण्याची वेळ आली आहे. घराच्या व्यवस्थेबाबत पती-पत्नीमध्ये काही मतभेद असू शकतात.
मीन : आज दिवसाच्या सुरुवातीला काही अडचणींचा काळ राहीला तरी दुपारनंतरची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल. हितचिंतकांची मदत तुम्हाला आशेचा किरण देईल. दिवसाची सुरुवात थोडी कष्टाची आहे संयमाने परिस्थिती हाताळा. वाहन किंवा महागड्या विद्युत उपकरणाच्या बिघाडामुळे मोठा खर्च होऊ शकतो. तुम्ही काही बोलल्याचाही वाईट परिणाम होऊ शकतो. तुमच्या प्रयत्नांमुळे व्यवसायात सुधारणा होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.