
जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२३
जळगाव शहरातील माजी उपमहापौर तथा नगरसेवक डॉ.अश्विन सोनवणे यांनी गेल्या आठवड्यात शहरातील समस्येबाबत आंदोलन सुरु केले होते त्यानंतर हे आंदोलन आ.राजूमामा भोळे यांनी सोडल्यानंतर मनपाने या आंदोलनाचा धसका घेत शहरातील वेगवेगळ्या प्रभागातील समस्या सोडविताना दिसत आहे.
शहरातील सुप्रीम कॉलनी मधील संत गजानन महाराज मंदीरामागील गट नं १८१ मध्ये अमृत योजनेच्या कामामुळे व पावसाच्या पाण्यामुळे कॉलनीतील रस्त्याची बिकट अवस्था झाली होती, याबाबत स्थानिक नगरससेवकला कल्पना दिली होती. मात्र या समस्याकडे स्थानिक नगरसेवकांनी दुर्लक्ष केले होते. त्यानंतर परीसरातील रहिवाश्यांच्या रस्ता समस्याबाबतचे स्वाक्षरी सहीत निवेदन मनपा आयुक्त यांना देण्यात आले. त्यांनीही दुर्लक्ष केले शेवटी आयुक्त यांना दिलेल्या निवेदनाची प्रत माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांना दिली. त्यांनी ही समस्या मार्गी लावुन अमृत योजनेमुळे व पावसाच्या पाण्यामुळे झालेली रस्त्याची बिकट अवस्थाची आज मुरुम टाकून डागडुजी केली. त्यामुळे परिसरातील रहिवाश्यांनी जळगाव शहराचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांचे आभार मानले.





















