जळगाव मिरर । २५ नोव्हेबर २०२२
पाचोरा तालुक्यातील एका गावातील २१ वर्षीय तरुणीचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करून तिच्या मनास लाज्ज उत्पन्न होईल असे कृत्य केल्या प्रकरणी पतीसह ३ जणावर पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पाचोरा तालुक्यातील एका २१ वर्षीय तरुणीचे परजिल्ह्यातील एका तरुणाशी विवाह झाला होता त्यानंतर २०२२ मध्ये तरुणीला पतीसह सासू, सासरे व नंणद यांनी वेळोवेळी त्रास देत विवाहितेचे अश्लील फोटो व व्हिडीओ व मजकूर सोशल मिडीयावर व्हायरल करीत तरुणीची बदनामी केल्या प्रकरणी व तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न केल्या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासू, सासरे व नंणदेवर पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनी प्रताप इंगळे हे करीत आहेत.