जळगाव मिरर | १९ जून २०२४
कुटुंबिय कामानिमित्त बाहेर गेलेले असताना पंडित रामदास वंजारी (वय ७२, रा. कुंभारवाडा, मेहरुण) यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवार दि. १८ जून रोजी सकाळी ११ वाजता कुंभारवाडा भागात घडली. वृद्धाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मेहरुण परिसरातील कुंभारवाडा परिसरात पंडित वंजारी हे पत्नी व मुलासह राहत होते. मंगळवार दि. १८ जून रोजी सकाळी ११ वाजता त्यांचे मुले आणि पत्नी कामामित्त बाहेर गेले होते. यावेळी घरात कुणीही नसताना वंजारी यांनी घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी वंजारी यांना खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.