जळगाव मिरर | ९ जानेवारी २०२४
राज्यातील अनेक शहरातून तरुण व तरुणीच्या आत्महत्या घटना नियमित वाचनात येत आहे. पण सध्या मुंबई शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ६० वर्षीय वृद्ध महिलेने ९ व्या मजल्यावरुन उडी मारुन आपले जीवन सपंवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कांदिवलीमध्ये दि.८ जानेवारी सोमवार रोजी मंगला राठोड या महिलेने ९ व्या मजल्यावरुन उडी मारुन आपले जीवन संपविले आहे. ही महिला पती, तीन मुले आणि सुनेसह कांदिवली परीसरात वास्तव्यास होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. त्यानंतर समतानगर पोलिसांनी वृद्ध महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठवला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून, या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.