जळगाव मिरर / १० मार्च २०२३ ।
जळगाव तालुक्यातील एका गावातील रोडावरून अवैध वाळूची वाहतूक करणारे महिंद्रा पिकअप पोलिसांनी ताब्यात घेत संशयित आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, जळगाव तालुक्यातील नंदगाव शिवारातील फेसर्डी येथून दि ८ मार्च रोजी सायकाळच्या सुमारास महेद्र पिकअप मालवाहू गाडीतून २ हजार रुपये किमतीची गौण खनिज वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने तालुका पोलीस स्थानकाचे पोना.संदीप पाटील यांनी हि गाडी पकडत कारवाई केल्याने वाळूमाफियामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी जीतेद्र बाभूळकर याच्या विरोधात गुन्हा करण्यात आला असून या प्रकरणी संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोहेका.ईश्वर लोखंडे हे करीत आहेत.