जळगाव मिरर | २१ ऑक्टोबर २०२३
राज्यात गेल्या काही वर्षपासून ठाकरे गटाच्या अनेक आमदारासह नेत्यावर चौकशीसह इतर अनेक गुन्हे नोंदविले जात असतांना आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे आमदार अडचणीत आले आहेत. त्यांना आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले असून त्यांची चौकशी देखील करण्यात येणार आहे.
ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांना 500 कोटींच्या कथित हॉटेल घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले आहे. चौकशीसाठी रवींद्र वायकर यांना 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मुंबईतील पोलिस मुख्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, अद्याप आपल्याला मुंबई पोलिसांचे समन्स मिळाले नसून समन्स आल्यास चौकशीसाठी हजर राहील, असे रवींद्र वायकर यांनी सांगितले आहे.