जळगाव मिरर | ३० डिसेंबर २०२३
सरत्या वर्षाला दोन दिवस राहिल्याने अनेक शाळेतून सहलीचे आयोजन करण्यात येत असते, पण यंदाच्या वर्षात या सहलीतील या शाळेतील सहल मोठ्या चर्चेत राहिली आहे. कर्नाटकच्या मुरुगामल्ला येथील एका सरकारी शाळेतील शिक्षिका आणि विद्याथ्यांच्या रोमॅटिक फोटोशूटमधील काही छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.
या विद्याथ्यांच्या पालकांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करत संबंधित शिक्षिकेवर कारवाईची मागणी केली. अमित सिंग नामक ट्विटर यूझरने शिक्षिका आणि विद्याथ्र्थ्यांचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ही शिक्षिका मुरुगामल्ला येथील सरकारी शाळेत कार्यरत असून विद्यार्थी दहावी इयत्तेत आहे. हे फोटोशूट शालेय सहलीतील आहे. छायाचित्रांमध्ये शिक्षिका आणि विद्यार्थी एकमेकांची गळाभेट, चुंबन घेताना दिसतात. विद्यार्थ्याने शिक्षिकेला उचलून देखील घेतले होते. विद्याथ्यर्थ्यांन शिक्षिकेच्या साडीचा पदर पकडला आहे तर शिक्षिकेच्या हातात गुलाबाचे फूल आहे.
अमितने या छायाचित्रांचे कोलाज ट्विटरवर शेअर करत एक समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत, असा प्रश्न उपस्थित केला. या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार करत शिक्षिकेवर कारवाईची मागणी केली आहे. बीईओ व्ही उमादेवी यांनी शाळेचा दौरा करत अहवाल मागितला आहे, व्हायरल छायाचित्रांमधील शिक्षिका आणि विद्यार्थ्यांची ओळख उघड करण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. अनेकांनी शिक्षिकेसोबत विद्यार्थ्यांवर देखील कारवाईची मागणी केली आहे.