जळगाव मिरर | २१ मे २०२३
गेल्या काही दिवसापासून बदलत्या हवामानामुळे राज्यातील उन्हाची तीव्रता वाढली असून शनिवारी दि.२० रोजी राज्यातील अकोला शहरात सर्वाधिक ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात दुपारनंतर ढगाळ वातावरण तर उर्वरित राज्यात उन्हाची तीव्रता होती. दरम्यान, आगामी दोन दिवस उन्हाची तीव्रता कायम राहणार असल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात शनिवारी सकाळपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवरील वर्दळीचे प्रमाण कमी झाले होते. यंदा अवकाळी पावसामुळे उन्हाळ्याच्या हंगामातील बहुतेक दिवस ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उन्हाचा कडाका यंदा यापूर्वी फारसा जाणवला नव्हता.
अकोला 44.4 , वर्धा 44.0, जळगाव 43.5, मालेगाव 42.8, अमरावती 42.6, बुलडाणा 40.7, नागपूर 43.0, ठाणे 36.8, जालना 42.5, बारामती 39.5, छत्रपती संभाजीनगर 41.2, परभणी 43.4, पुणे 38.8, महाबळेश्वर 33.2, बीड 41.9, नाशिक 37.5, सातारा 39.2, धाराशिव 41.6, सोलापूर 42.5, नांदेड 41.8, सांगली 40.4.