
जळगाव मिरर | २ डिसेंबर २०२४
दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अशोक जगन्नाथ शिंदे (वय ३४, रा. लक्ष्मीनगर) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याची दि. ३० नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील लक्ष्मी नगरात अशोक शिंदे हा तरुण वास्तव्यास होता. दि. २४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या दुचाकीचा अपधात होवून तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला नातेवाईकांनी दि. २५ रोजी शहरातील खासगी रुग्णालयात हलविले. याठिकाणी तरुणावर उपचार सुरु असतांना दि. ३० रोजी सकासळच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी जिल्हापेइ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात ाली आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील हे करीत आहे.