जळगाव मिरर | २९ डिसेंबर २०२३
राज्यभरातील अनेक तरुण शिक्षण घेवून पोलीस होण्याचे स्वप्न पाहत आहेत. पण अनेक तरुणांनी या पोलीस भरती येण्यापुर्वीच आपली जीवनयात्रा संपविल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहे. अशीच एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरात घडली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या १८ वर्षीय तरुणाने अकॅडमीच्या हॉस्टेलमध्येच गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. यात श्रीकांत दशरथ वाघ याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निपाणी आडगाव गावातील रहिवासी श्रीकांत दशरथ वाघ हा पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी वाळूज एमआयडीसी मधील गरुडझेप करियर अकॅडमीच्या हॉस्टेलमध्ये ११ महिन्यापासून राहत होता. गुरुवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास त्याने हॉस्टेलच्या बाथरूममध्ये जाऊन लोखंडी अँगलला कमरेचा बेल्ट बांधून स्वतःला गळफास लाऊन घेतला. श्रीकांतने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. या घटनेची नोंद वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.