जळगाव मिरर | १४ फेब्रुवारी २०२५
जाब विचारल्याचा राग आल्याने राहूल अशोक भारुडे (वय ३०, रा. शिरसोली, प्र.बो. ता. जळगाव) याच्या डोक्यात काचेचा ग्लास टाकून गंभीर जखमी केले. ही घटना दि. ११ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शिरसोली येथील हॉटेल प्रितजवळ घडली. याप्रकरणी राहूल संजय पवार रा. शिरसोली याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील शिरसोली येथील इंदिरा नगरात राहूल भारुडे हा तरुण वास्तव्यास आहे. दि. ११ रोजी रात्री गावाजवळील हॉटेल प्रित येथे जेवणासाठी गेला होता. जेवणाचे बिल देण्यासाठी गेलेला असतांना, संशयित राहुल पवार हा राहूल भारुडे म्हणाला की, तू दारु पिवून देवीची ज्योत आणतो. त्यावर भारुडे याने तुला ज्याने कोणी सांगितले असेल त्याला माझ्या समोर आण आपण समोरासमोर बोलू असे म्हणाला. त्याचा राग आल्याने राहूल पवार याने त्याठिकाणी पडलेला काचेचा ग्लास भारुडेच्या डोक्यात टाकून त्याला गंभीर जखमी केले. तसेच तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी देखील दिली. याप्रकरणी संशयित राहूल संजय पवार याचयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.