जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२५
मुलांना खेळविण्याठी बगिच्यात आलेल्या तरुणाच्या खिशातून चोरट्यांनी मोबाईल चोरुन नेला. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सूमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील काव्यरत्नावली चौकात असलेलया बगिच्यात सैय्यद अहसान अली हैदर (रा. शिवाजी नगर) हा तरुण मुलांना घेवून आला होता. लहान मुले खेळत असतांना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या खिशातून महागडा मोबाईल चोरुन नेला. ही घटना लक्षात येताच, त्यांनी रामानंद नगर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर नाईक हे करीत आहे.