जळगाव मिरर | २३ ऑक्टोबर २०२४
लग्नाचे अमीष दाखवित २५ वर्षीय तरुणीवर दोन वर्षांपासून अत्याचार करीत तीला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना उडकीस आली. तरुणीने लग्नासंदर्भात तरुणाकडे विचारणा केल्यानंतर त्या तरुणासह आईने लग्नास नकार दिला. त्यामुळे तरुणीने एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी तरुणासह त्याच्या आईविरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूळची ठाणे येथील २५ वर्षीय तरुणीचा बेबी केअरचा व्यवसाय आहे. या तरुणीची धनराज अवदेष पासवान (वय २०, रा. कुसुंबा, ता. जळगाव) याच्याशी ओळख झाली. त्याने या तरुणीला लग्नाचे अमिष दाखविले. त्यानंतर २०२२ ते दि. १४ ऑक्टोंबर २०२४ दरम्यान त्याने पीडितेवर अत्याचार केला. या अत्याचारातून तरुणी गर्भवती झाली. तरुणीने लग्न करण्यासंदर्भात विचारणा केली असता संशयित धनराज तसेच त्याच्या आईने तरुणीला बाळ पाडण्याचे सांगीतले. त्यास याला तरुणीने नकार दिल्यानंतर तुम्हाला काय करायचे ते करा आमम्ही लग्न करणार नाही, असा पीडितेला दोघांनी दम भरला.
पीडितेने न्यायालयात कैफियत मांडली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. त्यानंतर घटनास्थळानुसार ही तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्राप्त झाली. त्यानुसार संशयित तरुणासह त्याच्या आईविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला