जळगाव मिरर | २७ नोव्हेंबर २०२३
गेल्या काही वर्षभरापासून अनेक तरुण तरुणी भररस्त्यावर रिल्स बनवून फेमस होण्याचे स्वप्न पाहत असतात यात काही फेमस देखील होतात पण काहींना चांगेलच महागात पडत असते. अशीच एक घटना धुळे शहरात घडली आहे यात मात्र तरुणाला फेमस होणे चांगलेच महागात पडले आहे.
नेमका काय घडला प्रकार
धुळे शहरातील देवपूर बस स्थानक परिसरामध्ये एका तरुणाने शाळकरी मुलींसमोर ‘पैसा फेक तमाशा देख’ या गाण्यावर गजब प्रकारचा डान्स करीत रिल्स तयार केलं. यामुळे येथे बसलेल्या काही तरुणी संतापल्या व याच्यात मोठा राडा झाला याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तरुणाला पकडले. तरुणाने ज्या ठिकाणी रिल्स तयार केली.
त्या ठिकाणी पोलीस या तरुणाला घेऊन गेले. त्या मुलींसमोर दोन्ही कान पकडून उठाबशा काढत बेडूक उड्या मारायला लावल्या. त्याचबरोबर ज्या मुलींना हावभाव करूनही रिल्स तयार केली होती. त्या सर्व मुलींच्या पाया पडून त्याला माफी देखील मागायला लावली आहे. माफी मागितल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी या तरुणाला देवपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणाची पुढील कारवाई देवपूर पोलीस करीत आहेत.