जळगाव मिरर | ८ ऑक्टोबर २०२३
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात राजनांदगाव ते कळमणा स्टेशनदरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी भुसावळ भागातून जाणाऱ्या चार गाड्या १२ ते १५ ऑक्टोबरदरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत.
या मार्गावर यार्ड रिमॉडेलिंगसाठ इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि नॉन- इंटरलॉकिंगचे काम यादरम्यान करण्यात येणार आहे. या बदलाची प्रवाशांनी नोंट घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या रेल्वेगाड्या करण्यात आल्या रद्द
गाडी क्र. १२८४९ बिलासपूर-पुणे एक्स्प्रेस ही १२ रोजी सुटणारी गाडी सुरुवातीच्या स्थानापासून रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्र. १२८५० पुणे-बिलासपूर एक्स्प्रेस १३ रोजी रद्द,
गाडी क्र. १२९४९ पोरबंदर-संत्रागाची एक्स्प्रेस १३ रोजी रद्द,
गाडी क्र. १२९५० संत्रागाची पोरबंदर एक्स्प्रेस १५ रोजी रद्द करण्यात आली आहे.