जळगाव मिरर | २९ डिसेंबर २०२४
पुणे येथे मुलाकडे गेलेल्या सेवानिवृत्त अरविंद शंकर लाठी (वय ७३, रा. रामबाग कॉलनी) यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून चोरटयांनी ३० हजार रुपयांचे १ हजार २०० ग्रॅम वजनाचे चांदीचे ग्लास चोरुन नेले. ही घटना दि. २७ डिसेंबर रोजी लाठी दाम्पत्य घरी आल्यानंतर उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आयएमआय महाविद्यालय परिसरातील रामबाग कॉलनीत अरविंद लाठी हे सेवानिवृत्त कर्मचारी वास्तव्यस आहे. त्यांचा मुलगा हा पुण्यात राहत असल्याने लाठी दाम्पत्य दि. ४ डिसेंबर रोजी त्याला भेटण्यासाठी पुण्याला गेले होते. काही दिवस मुलाकडे थांबलेले लाठी दाम्पत्य हे दि. २७ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घरी परतले. यावेळी त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसून आला. त्यांनी घरात प्रवेश केला असता, त्यांना हॉलमधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला. त्यामुळे अरविंद लाठी यांना घरात चोरी झाल्याची खात्री झाली.
चोरट्यांनी लाठी यांच्या घरातील कपाटात ठेवलेले १ हजार २०० ग्रॅम वजनाचे ३० हजारांचे चांदीचे ग्लास चोरुन नेले. तसेच कपाटात ठेवलेली रोकड देखील चोरट्यांनी चोरुन नेली. दरम्यान, लाठी यांनी लागलीच घटनेची माहिती जिल्हापेठ पोलिसांना दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक शांताराम देशमुख हे करीत आहे