
जळगाव मिरर | २ एप्रिल २०२६
मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम पेठ भागातील रहिवासी डॉ. अजिजुल्ला इस्माईल शेख (वय ६२) व त्यांच्या पत्नी २६ मार्च रोजी पुणे येथे घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून मुलाकडे गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी रोख २८ हजार ५०० रुपये व ३ हजार ५०० रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या चोरून नेल्या. दि. २९ मार्च रोजी डॉ. शेख हे घरी आले, त्यावेळी त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी ३१ मार्च रोजी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वीरेंद्र शिंदे करीत आहेत.





















